चाकणमध्ये नायब तहसिलदारांला बघून घेण्याची दिली धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/crime-4.jpg)
चाकण – जमिनीची मोजणी करण्यास गेलेल्या नायब तहसीलदारांसह त्यांच्या सहकार्यांना एकाने शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि.२२) सकाळी अकराच्या सुमारास चाकण येथे घडली.
याप्रकरणी नायब तहसीलदार राजेश किसनराव कानसकर (वय ४०) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, संदीप सुदाम शेवकारी (वय ५०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी खेडचे नायब तहसीलदार राजेश कानसकर हे आंबेठाण येथील एका जागेची मोजणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत चाकणचे तलाठी आचार्य चाकाण, कोतवाल घाडगे, भूमापक साबळे, भगत, म्हस्के हे देखील होते. यावेळी हे सर्व अधिकारी आरोपी संदीप यांच्या शेजारी असलेली जमीन मोजण्याचे काम करत होते. यावेळी शेजारच्या जमिनीची हद्द आपल्याकडे सरकल्याच्या वादातून संदीप याने नायब तहसीलदार यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करत बघुन घेण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी संदीप शेवकारी याला पोलिसांनी अटक केली आहे.