breaking-newsपुणे
घोडेगावमध्ये बिबट्याचा दुचाकीस्वारांवर हल्ला, ७ जण जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/9-8.jpg)
पुणे जिल्ह्यातील घोडेगावमध्ये बिबट्याने दुचाकीवर हल्ला करत सात जणांना जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी घुलेवाडी येथील धनगराचा घोडा एका बिबट्याने ठार केला होता. तर आज भीमाशंकर-घोडेगाव रस्त्यावरील धोंडमाळ-शिंदेवाडी येथे पाच दुचाकीस्वारांवर हल्ला करुन सात जण जखमी केल्याची माहिती मिळते.बिबट्याचे हल्ले वाढू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून या नरभक्षक बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.