गृहमंत्र्यांनी पुणे पोलिसांसोबत केक कापत केले नवीनवर्षाचे स्वागत
![Home Minister cuts cake with Pune police to welcome New Year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Anil-Deshmukh-wishes-new-year-from-pune-police-control-room-take-complaints.jpg)
पुणे – राज्यात कोरोनाचे सावट असले तरीही या संकट काळात काळजी घेत नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जात आहे. 2020 मध्ये जगावर आलेल्या संकटावर मात करत सर्वचजण 2021 या नवीन वर्षात प्रवेश करत अनेक नवीन संकल्प करत आहेत.
कोरोना काळात नवीन वर्ष बाहेर हॉटेल, पब, बारमध्ये साजरे करण्यास निर्बंध असले तरीही कुटुंबासोबत अनेकजण उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता पुणे पोलिसांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले.
वाचा :-येणारे वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा – मुख्यमंत्री
नवीन वर्षाचे निमित्ताने अनिल देशमुख यांनी रात्री 12 वाजता पुणे पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहत नववर्षाचे स्वागत केले. गृहमंत्र्यांनी यावेळी होप 2021 असे लिहिलेला केप कापला. यावेळी त्यांनी पोलीस दलाला शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी देशमुखांनी कंट्रोल रूम’ला येणारा नव्या वर्षातला पहिला म्हणजेच, ३१ डिसेंबरच्या रात्री बारा वाजता येणारा पहिला ‘कॉल’ स्वत: उचलत तक्रार जाणून घेतली. यावेळी . सिंहगड रोड वरील आनंद नगर मधील एका सोसायटी परिसरात मोठ्या आवाजात स्पिकर्स सुरू असल्याची तक्रार एका व्यक्तीने केली. या व्यक्तीच्या तक्रारीनंतर देशमुखांनी “तुमची तक्रार बाजूच्या पोलीस स्टेशनला सांगतो” असे म्हणत तक्रारदाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.