कोरोना संसर्ग वाढणार?, पुण्यात पुढचे तीन दिवस धोक्याचे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/8-7.jpg)
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी
पुण्यात करोनाचे आठ रुग्ण आढळल्यानंतर पुणेकरांची झोप उडालेली असताना पुणेकरांना पुढचे आणखी तीन दिवस सतर्क राहावं लागणार आहे. पुढचे तीन दिवस पुण्याचं तापमान कमी राहणार आहे, त्यामुळे करोनाच्या विषाणूंसाठी हे वातावरण पोषक असल्याने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुण्यात १५ मार्चपर्यंत २७ अंश सेल्सिअसच्या आत तापमान राहणार आहे. हे तापमान करोनाच्या विषाणूंसाठी पोषक असते. त्यामुळे करोनाचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे पुणेकरांनी पुढचे तीन दिवस काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. १५ मार्चनंतर पुण्यातील तापमान वाढणार असल्याने त्यानंतर करोनाचा प्रादूर्भाव कमी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, विदर्भात गारांसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भातील तापमानही कमी होण्याची शक्यता आहे.