कोरेगाव भिमा शाैर्यदिन; 15 फेसबुक पेजवर पाेलिसांची कारवाई
पुणे |महाईन्यूज|
काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह 25 टिकटाॅक व्हीडीओ पाेलिसांकडून डिलीट करण्यात आले. तर 15 फेसबुक पेज सुद्धा बंद केले आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिली. तसेच साेशल मीडियावर आक्षेपार्ह पाेस्ट टाकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पाेलिसांना देण्यात आले आहेत.
यंदा 1 जानेवारी 2020 रोजी काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणा-याची संख्या वाढणार आहे. त्या पार्श्वभूमिवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून माेठ्याप्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. आक्षेपार्ह असणाऱ्या 25 टिकटाॅक व्हिडीओवर कारवाई करत पाेलिसांनी ते डिलीट केले आहेत. तर 15 फेसबुक पेज बंद करण्यात आले आहेत. 142 कलमानुसार अनेक व्हाॅट्सअप ग्रुपच्या प्रमुखांना देखील पाेलिसांडून नाेटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबराेबर या काळात साेशल मीडियावर आक्षेपार्ह, प्रक्षाेभक लिखाण करणाऱ्यांवर पाेलिसांच्या सायबर सेलच्या मार्फत लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्यावर याेग्य ती कडक कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच शिक्रापूर – लाेणीकंद पाेलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावता येणार नाहीत असे पाेलिसांकडून ग्रापपंचायतींना कळविण्यात आले आहे. तसेच असे फ्लेक्स लागल्यास त्या ग्रामपंचायतींनी तातडीने पाेलिसांना कळविण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे. 2 तारखेपर्यंत या गावांमध्ये कुठलेही आक्षेपार्ह फ्लेक्स, फलक लागल्यास पाेलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.