Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
कोथरुड परिसरातील दहा सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी तडीपार
पुणे – कोथरूड परिसरात शरीराविरूध्दचे गुन्हे करणाऱ्या 10 सराईत गुन्हेगारांना परिमंडळ 3 च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी 2 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
धिरज नथु कुडले (26), उमेश शाम सातपुते, अक्षय सुनील पवार, राजु प्रकाश फाले, भुषण बाळु डफळ, समिर उर्फ बंटी अंकुश पासलकर, ओकांर उर्फ आबा शंकर कुडले, प्रविण तुकाराम कुडले, समाधान भारत रणदिवे अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोथरूड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष पाटील, पोलीस कर्मचारी श्रीकांत माने, विलास ढोले, अजय सावंत, भास्कर बुचडे यांनी ही कारवाई केली