काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण लवकरच – माजी गृहमंत्री सुशीलकूमार शिंदे

सोलापूर |महाईन्यूज|
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं लवकरच विलिनीकरण होणार असल्याचं अतिशय महत्त्वाचं वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. ‘दोन्ही पक्ष थकले असून आता भविष्यात आम्ही एकत्र होऊ.’ असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. त्या भेटीनंतर अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती की, राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस या वृत्ताचं खंडन केलं होतं. पण आता स्वत: सुशीलकुमार शिंदे यांनी असं म्हटलं आहे की, भविष्यात दोन्ही पक्ष हे एकत्र येतील. ते सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
संपूर्ण देशात २०१४ पासून भाजपचं वादळ पाहायलं मिळतं आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत तरी भाजपचा विजयाच्या वारु रोखला जाईल अशी विरोधकांना आशा होती. पण या निवडणुकीत भाजपने २०१४ पेक्षाही मोठा विजय मिळवत विरोधकांना प्रचंड मोठा धक्का दिला होता. तेव्हापासून काँग्रेसच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची देखील तिच अवस्था झाली. त्यात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधीन अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हो दोन्ही पक्ष अक्षरश: खिळखिळे झाले आहेत. यामुळेच संपूर्ण राजकीय परिस्थितीची आकलन करुन सुशीलकुमार शिंदे यांनी विलीनीकरणाविषयी वक्तव्य केलं आहे.





