ऑनलाईन संस्था नोंदणीच्या निर्णयाविरोधात वकील करणार सोमवारपासून बेमुदत उपोषण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Advocate-.jpg)
- धर्मादाय आयुक्त, मुख्यमंत्री, विधी, न्याय विभागाच्या सचिवांना पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनकडून निवेदन
पुणे – धर्मादाय संस्था नोंदणीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनेच दाखल करण्याचा कार्यालयीन आदेश महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी नुकताच जारी केला आहे. पुण्यातील न्यास नोंदणी कार्यालयातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशने हा कार्यालयीन आदेश तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. पूर्वीप्रमाणे संस्था नोंदणीच्या फाईल दाखल करून घेण्यात याव्यात, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. हा कार्यालयीन आदेश तातडीने रद्द न झाल्यास येत्या सोमवारपासून (28 मे) बेमुदत उपोषण करण्याची नोटीस धर्मादाय आयुक्त तसेच पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे.
याविषयी असोसिएशनचे सचिव मोहन फडणीस म्हणाले, की या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच विधी व न्याय विभागाच्या सचिवांना पाठविण्यात आल्या आहेत. उपोषणाबाबत दिलेल्या नोटीसीला उत्तर देताना ऍड. सुनिल मोरे यांना पुणे विभाग धर्मादाय सह आयुक्त यांच्याकडून कळविण्यात आले की, संबंधित निवेदन उचित कार्यवाहीसाठी राज्य धर्मादाय आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहे. त्यावर निर्णय होईपर्यंत उपोषण करू नये.