Breaking-newsपुणे
पुण्यातील ‘एमआयटी’चा विद्यार्थी कार्तिक घोरमाडे बेपत्ता
पुणे, महाईन्यूज, प्रतिनिधी
पुण्यातील ‘एमआयटी’ महाविद्यालयाचा विद्यार्थी कार्तिक किशोर घोरमाडे (वय 19) काल सोमवारपासून बेपत्ता आहे. त्याचे आई-वडिल चिंतेत पडले आहे. शहर आणि शहराबाहेरील परिचीत परिसरात त्यांनी कार्तिकची शोधाशोध केली आहे. शेवटी त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांकडूनही त्याचा शोध युध्दपातळीवर सुरू आहे.
कार्तिकची उंची पाच फुट नऊ इंच आहे. सोमवारी (दि. 23) तो महाविद्यालयाचा गणवेश घालून कॉलेजला गेला. तो कोथरुड येथील ‘एमआयटी’ महाविद्यालयात ‘बीई’ प्रथम वर्षात शिकत आहे. जर वरील वर्णनाचा मुलगा आपल्या निदर्शनास आला तर वडिल किशोर घोरमाडे (मो- 7774015177) आणि राहूल गावंडे (मो- 9975214674) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वडिलांनी केले आहे.