breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एचडीएफसी बँकेकडून पुण्‍यामध्‍ये मोबाइल एटीएमची सुविधा

  • सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोबाइल एटीएम सुविधा कार्यान्वित

पुणे । एचडीएफसी बँकेने आज लॉकडाऊनदरम्‍यान पुणे शहरामधील ग्राहकांना साह्य करण्‍यासाठी मोबाइल ऑटोमेटेड टेलर मशिन (एटीएम)ची सुविधा सुरू केली. मोबाइल एटीएम सुविधेमुळे ग्राहकांना पैसे काढण्‍यासाठी त्‍यांच्‍या परिसरामधून बाहेर पडण्‍याची गरज भासणार नाही.

पुणे शहरापूर्वी बँकेने मुंबई, नवी दिल्‍ली, अलाहाबाद, कोईम्‍बतूर, चंदिगड व चेन्‍नई येथे अशा प्रकारची मोबाइल एटीएम सुविधा सुरू केली आहे. पुणे शहरामधील स्‍थानिक महापालिका अधिका-यांसोबत सल्‍लामसलत करत मोबाइल व्‍हॅन तैनात करण्‍यासाठी ठिकाणे ठरवण्‍यात आली आहेत.

दररोज मोबाइल एटीएम सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३ ते ५ ठिकाणी पोहोचतील. एटीएमसाठी रांगेत उभे असताना या मोबाइल एटीएममध्‍ये कर्मचारी व ग्राहकांच्‍या सुरक्षिततेच्‍या खात्रीसाठी सोशल डिस्‍टन्सिंग राखण्‍यासह सॅनिटायझेशनसंदर्भात आवश्‍यक खबरदारी घेतली जात आहे.

एचडीएफसी बँकेमधील शाखा बँकिंग प्रमुख श्री. अभिषेक देशमुख म्‍हणाले,”या कठीण काळामध्‍ये आम्‍ही सर्वांना #Stay Home आणि #Stay Safeसाठी मदत करण्‍याकरिता आमचे सर्वतोपरी प्रयत्‍न करू इच्छितो. आमच्‍या मोबाइल एटीएम सेवा आमचे ग्राहक व सामान्‍य लोकांना सुलभपणे पैसे काढण्‍यास तसेच इतर सुविधा देखील देतील. आम्‍ही कोविड-१९चा प्रादुर्भाव थांबवण्‍यासाठी आमचा पाठिंबा देतो.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button