breaking-newsपुणे

उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

पुणे – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कात्रज येथील घरी जाऊन शुक्रवारी भेट घेतली. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली येथे उपरस्त्यांच्या झालेल्या दुर्देशेवरून उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखल ओतून त्यांना धक्काबुक्की केली होती.

नितेश राणे यांच्यासह त्यांच्या १८ समर्थकांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल रात्री त्यांना अटक करण्यात आली होती.

नितेश राणे यांनी केलेल्या कृतीचा त्यांचे वडील नारायण राणे यांनीही निषेध करत तातडीने अधिकाऱ्याची जाहीर माफी मागितली होती. कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र या चौपदरीकरणाने महामार्गालगतच्या उपरस्त्यांवर चिखल साचला आहे. रस्त्यांवर खड्डेही पडले आहेत. तेव्हा प्रथम उपरस्त्यांची कामे न करता महामार्ग चौपदरीकरण सुरू असल्याबद्दल जाब विचारायला नितेश राणे आले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button