आर्थिक वर्ष 2018-19 च्या ITR रिटर्न भरण्यासाठी फक्त 15 दिवस बाकी; e-verification साठी 30 सप्टेंबर अंतिम तारीख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/tax.jpg)
पुणे: कर भरणे आणि तो वेळेत भरणे हे प्रत्येक पगारदार नागरिकाचे कर्तव्य आहे. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात आर्थिक वर्ष 2019-20 चा टॅक्स फायलिंग तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. परंतु, आर्थिक वर्ष 2018-19 (FY 2018-19) चा टॅक्स फायलिंग अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. त्यापूर्वी टॅक्स फायलिंग न केल्यास पेन्लटी भरावी लागू शकते. त्यामुळे फायलिंग करण्यासाठी केवळ 15 दिवस बाकी आहेत. ज्या करदात्यांनी 2015-16 ते 2019-20 दरम्यान इन्कम टॅक्स फायलिंग केलेली आहे.
परंतु, ई-व्हेरिफिकेशन करायचे राहिले आहे. अशा करदात्यांसाठी सेंटर्स बँक ऑफ डारेक्ट टॅक्सेसने मुभा दिली आहे. करदात्यांनी टॅक्स फायलिंग केल्यानंतर 120 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रीया पूर्ण करायची असते. जर ई-व्हेरिफिकेशन्स करायचे राहिल्यास आयटी फायलिंग न केल्याचे मानले जाते. तसंच Income Tax Act for non-filing of return of income च्या विविध कलमांअंतर्गत पेनल्टी लागू केली जाऊ शकते. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे CBDT कडून आयटी रिटर्न फायलिंगची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली होती. त्यामुळे आता आयटी फायलिंग करण्यास आणि ई-व्हेरिफिकेशन केले नसले तर ते करण्यास केवळ 15 दिवसांची मुदत आहे. इन्कम टॅक्स रिटर्न हे ई-व्हेरिफिकेशन OTP द्वारे किंवा ITR-V ची स्वाक्षरी केलली कॉपी CPC बंगलोरच्या ऑफिसला स्पीड पोस्ट किंवा पोस्टने पाठवून करु शकता.