breaking-newsपुणे

अवघ्या चार तासात पोलिसांनी मुकबधीर मुलाला केले आई-वडिलांच्या स्वाधीन

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

मुंबईकडे जाणा-या मिनी बसमधून खाली उतरलेल्या दहा वर्षाच्या विकलांग मुकबधीर मुलाला खोपोली पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्या कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. खोपोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरवलेला मुकबधीर मुलगा त्याच्या आई-वडिलांना परत मिळाला आहे.

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बाजुवर निशी सागर हॉटेलच्या परिसरात एक विकलांग मुकबधीर दहा वर्षाचा मुलगा फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यावर खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉनस्टेबल कादर तांबोळी त्यांच्या वरिष्ठांसोबत निशी सागर हॉटेल परिसरात पोहोचले. त्यांनी मुलाला ताब्यात घेतले. मुलगा मुकबधीर असल्यामुळे त्याचा पत्ता शोधणे मुश्किल होते. पोलिसांना याबाबत संशय आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली.

पोलिसांनी खालापूर टोलनाक्यावर सीसीटीव्ही तपासून पाहिले. त्यावर हा मुलगा एका मिनी बसमधून खाली उतरल्याचे निष्पन्न झाले. त्या मिनीबसचा नंबर घेऊन पोलिसांनी बसमालकाचा शोध घेतला. त्यांच्याशी संपर्क साधून मुलाच्या नातेवाईकांची माहिती घेतली. त्याच्या आई-वडिलांना पोलिस ठाण्यात बोलाऊन मुलाला त्यांच्या स्वाधीन केले. अवघ्या चार तासातच पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे आई-वडिलांना त्यांचा मुलगा मिळाला. मुलाचे वडिल संतोष ज्ञानेश्वर पवार (वय 40) भवानीपेठ, जि. सातारा येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button