Uncategorizedपश्चिम महाराष्ट्रपुणेमुंबई

अमृता फडणवीसांबद्दल अश्लील कमेंट, पुण्यात तरुणाला अटक

 

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लील कमेंट्स करणाऱ्या तरुणाला पुण्यातील आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमित वायकर (रा. कावळे मळा, चाळकवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी आळेफाटा पोलिसात तक्रार दाखल केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, अमित वायकर हा मोबाईलवर फेसबुक सोशल मीडिया बघत होता. त्यावेळी त्याने एका वृत्तपत्राची बातमी पाहिली. ठाणे येथील सभेत खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याची ती बातमी होती. बातमी वाचन असताना त्याने कमेंट बॉक्समध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक अश्लील कमेंट केली. ही टिप्पणी अतिशय खालच्या भाषेत असल्याची माहिती आहे.

अमितने केलेली कमेंट सर्व समाज माध्यमांवर व्हायरल झाली. राजकारणातील एका प्रतिष्ठित आणि मोठ्या व्यक्तीच्या पत्नीबद्दल असे शब्द वापरल्याने खळबळ उडाली. याची दखल जुन्नरच्या भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी घेतली. त्यांनी या तरुणा संदर्भात थेट आळेफाटा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखत अमित वायकर नावाच्या तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

वायकर याने अश्लील कमेंट्स केल्याचे लक्षात आल्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी तक्रार केली. पोलीसांनी अमित वायकर याला ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button