breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘पुण्याची ओळख आता ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’; जयंत पाटील संतापले

Pune Drugs case : विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात ड्रग्ज विक्रेत्यांचा सुळसुळाट दिसतोय. एका नामांकीत हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणामुळे आता सत्ताधारी चांगलेच अडचणीत सापडले असून विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडले आहे . पुण्यातील एका हॉटेल मधे तरुण ड्रग्जचे सेवन करत होते त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेल मालकाला आणि पार्टी करणाऱ्या तरुणाना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आह. या प्रकरणी आता काष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्वीट करत सरकारवर कडाडून टीका केली आहे. पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे.

अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत. ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे.’ असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

हेही वाचा  –  ‘संतांच्या अनुकरणाने काम करतं राहिल्यास समाज त्यांच्या माघे उभा राहतो’; खासदार श्रींरंग बारणे 

पुण्याच्या L3 हॉटेलच्या 2 कर्मचाऱ्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात सध्या ड्रग्ज विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. एका नामांकीत हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आणि एकच खळबळ उडाली आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी L3 हॉटेलमधील 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले, त्यामध्ये हॉटेलचा मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. संबंधित प्रकाराचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह राजपूत घटनास्थळी दाखल झाले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर घटनास्थळी दाखल झाले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले. पुणे पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण करण्यात आले. लिक्विड लीजर लाउंज L3 या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले.

संबंधित प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. पोलीस आणि उत्पादन शुल्क मंत्री हप्ते घेत असल्याने पुण्यातील अशा अनेक हॉटेल आणि बारमध्ये सर्रासपणे अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे आता नवी खळबळ उडाली.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ड्रग्स प्रकरणाची गंभीर दाखल घेतली. त्यानंतर पुणे पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे सांगितले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांचे निलंबन करण्याची कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली. तसेच संपूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलिसांची स्वतंत्र मोहिम सुरु करण्यात आली. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे.

पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात पार्टी करणाऱ्या मुलांना पुणे पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहे. पार्टीसाठी आलेल्या मुलांची पुणे पोलीस चौकशी करणार आहे. ड्रग्स प्रकरणात पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्या आरोपींना रविवारी अटक केली आहे. पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बार मालकांसह मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केला आहे.अटक केलेल्या आठही जणांना पुणे पोलीस कोर्टात हजर करणार आहेत.

पुणे ड्रग्ज प्रकरणी कडक कारवाई करा, अशी सूचना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करून कालच्या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी सूचना पोलीस आयुक्तांना दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button