breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएम आणि तालेरा रुग्णालयात सोनोग्राफी मशिन उपलब्ध करा

  • पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाची मागणी
  • आयुक्त आणि महापौरांना दिले निवेदन

पिंपरी / महाईन्यूज

सोनोग्राफी हे वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यास अत्यंत उपयुक्त असं उपकरण आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा व वायसीएम रुग्णालयात गरोदर मातांवर उपचार व बाळंतपण हे विनामूल्य होत असल्याने उपनगरातील शेकडो महिला उपचारासाठी येथे येत असतात. सोनोग्राफीची कमतरता भासत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने महापौर उषा ढोरे व पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सोनोग्राफी मशिनच्या उपलब्धतेबाबत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गर्भवती स्त्रीला गर्भ राहिल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत त्याची वाढ, हालचाल बघणं हे एक विलक्षण आश्चर्य केवळ सोनोग्राफीमुळे साध्य झालं आहे. याशिवाय गरोदरपणा, गर्भात असणारे आजार, विकार, दोष यांची पण बऱ्याच अंशी माहिती मिळवू शकते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा व वायसीएम रुग्णालयात सोनोग्राफीची सोय आहे परंतु ती तुटपुंजी आहे.

रुग्णांना २ दिवसांपेक्षा अधिक काळ सोनोग्राफी तपासण्यासाठी लागत असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गरोदरपणात चाचण्या आवश्यक असतात. पुणे शहरात पालिकेची २० मातृत्व रुग्णालये व ५ शासकीय रुग्णालये आहेत. या सर्व ठिकाणी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. अशाच रीतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात सोनोग्राफीची सोय करावी.

यावेळी शहर भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस व वीरंगना सोशल फाऊंडेशन अध्यक्षा तेजस्विनी कदम, श्रेया सावंत, नम्रता माळी, स्मिता रसर, शुभांगी कसबे, सारिका माळी आदी उपस्थित होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button