क्रिडा

प्रो लीग हॉकी (पुरुष): सलग तिसऱ्या विजयासाठी भारतीय हॉकी संघ उत्सुक

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या लढतीत फ्रान्सला ५-० अशी धूळ चारली, तर दक्षिण आफ्रिकेचा त्यांनी १०-२ असा धुव्वा उडवला. शनिवारी फ्रान्सविरुद्ध तिसरा सामना खेळल्यानंतर रविवारी भारताला आफ्रिकेशी दोन हात करायचे आहेत. दोन विजयांच्या सहा गुणांसह भारत सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असून नेदरलँड्स (१० गुण) आणि बेल्जियम (७) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत.
टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतासाठी युवा जुगराज सिंगने चमकदार कामगिरी केली आहे. त्याला मनप्रीत, हरमनप्रीत सिंग, दिलप्रीत सिंग, वरुण कुमार यांनी उत्तम साध दिली. भारतीय संघ यंदा राष्ट्रकुल, आशियाई यांसारख्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होणार असल्याने प्रो लीगमधील कामगिरीद्वारे आत्मविश्वास उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कर्णधार मनप्रीतने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button