ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

प्रियांका गांधी निवडणूक का लढवत नाही?

निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम

मुंबई : सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. मात्र, काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, प्रियांका गांधी यांनी आता निवडणूक न लढण्याचा निर्णय का घेतला, याबाबत भाष्य केलं आहे

मी मागील १५ दिवसांपासून रायबरेलीमध्ये प्रचार करते आहे. रायबरेलीशी गांधी घराण्याचे फार जुने संबंध आहेत. त्यामुळे येथील जनतेला प्रत्यक्ष येऊन भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही बाहेर कुठेतरी बसून रायबरेलीत प्रचार करू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.

जर मी आणि राहुल गांधी यांनी एकाच वेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता, तर आम्हाला आमच्या मतदारसंघात किमान १५ दिवस तरी राहावे लागले असते आणि इतर ठिकाणांच्या प्रचारावर लक्ष्य केंद्रीत करता आले नसते. परिणामी भाजपाचा फायदा झाला असता. म्हणूनच राहुल गांधी यांनी निवडणूक लढवण्याचा आणि मी केवळ प्रचार करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.

भविष्यात प्रियांका गांधी या निवडणुकीच्या रिंगण्यात दिसतील का? असं विचारलं असता, मी निवडणूक लढवण्याचा अद्याप कोणताही विचार केलेला नाही. मला फक्त पक्षासाठी काम करायचे आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडायला मी तयार आहे. जर लोकांना वाटत असेल की मी निवडणूक लढवावी, तरच मी निवडणूक लढवेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, प्रियांका गांधी भाजपाला घाबरतात आणि त्यामुळेच त्या निवडणूक लढवत नाहीत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती. या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. काँग्रेस पक्ष भाजपाच्या धोरणानुसार चालत नाही, असे त्या म्हणाल्या. जर मी आणि राहुल यांनी एकाच वेळी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, तर आम्हाला व्यवस्थित प्रचार करता येणार नाही, ज्यामुळे भाजपाचा फायदा होईल, खरं तर काँग्रेस आणि अमेठी-रायबरेलीचं नातं वेगळं आहे, असे त्या म्हणाल्या. याबरोबरच पंतप्रधान मोदी गुजरातच्या वडोदरामधून निवडणूक का लढवत नाही. ते गुजरातमधून निडणूक लढवायला घाबरतात का? असा प्रश्नाही त्यांनी भाजपाला विचार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button