breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील सभा स.प. महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस कोर्स येथे होणार

पुणे : पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी स.प. महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस कोर्स येथे सभा होण्यात असल्याचे भाजप तर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभा स्थळात बदल करण्यात आलेले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडुन बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, पुण्यात मुरलीधर मोहोळ, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

हेही वाचा – ‘विरोधकांची हरण्याच्या हताशेने शिवीगाळ’; देवेंद्र फडणवीस

या चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे शहर भाजपतर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार भाजपने सभेची तयारी देखील सुरू केलेली होती.

नरेंद्र मोदी यांच्या सभेला किमान एक लाख नागरिक उपस्थित राहतील असे नियोजन भाजपतर्फे करण्यात आलेले असून, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, मनसे या घटक पक्षांना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सभेसाठी स. प. महाविद्यालयाचे मैदान लहान पडू शकते यामुळे आता जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. २९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता रेस कोर्सच्या मैदानावर ही सभा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button