पिंपरी / चिंचवड

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाकडील 48 हजारांचा ऐवज केला लंपास

पिंपरी l प्रतिनिधी

मी पोलीस डिपार्टमेंटचा माणूस आहे. तुम्ही गांजा विकता अशी बतावणी करून एका व्यक्तीने वृद्धाकडील सर्व ऐवज रुमालात बांधून तो वृद्धाच्या खिशात ठेवण्याचा बहाणा केलं. त्यानंतर हातचलाखी करून वृद्धाकडील 48 हजारांचा मुद्देमाल त्याने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी आळंदी येथे घडली.

ज्ञानेश्वर धोंडिबा रंधवे (वय 72, रा. च-होली खुर्द, ता. खेड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 19) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रस्त्याने जात असताना एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला. ‘मी पोलीस डिपार्टमेंटचा माणूस आहे. तुम्ही गांजा विकता’ अशी त्याने फिर्यादी यांना बतावणी केली. फिर्यादी यांना चारचाकी वाहनाच्या आडोशाला नेऊन त्यांच्या खिशात जबरदस्तीने हात घालून पैसे आणि मोबाईल काढला. सोन्याची चेन, दोन अंगठ्या असा ऐवज आरोपीने रुमालात ठेवण्यास सांगितला. तो ऐवज रुमालात बांधून फिर्यादी यांच्या खिशात ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखी करत आरोपीने 48 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button