breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Pravin Darekar|सत्ताधा-यांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही : प्रविण दरेकर

पेण: एखाद्या घटनेचा राजकीय स्वार्थासाठी भांडवल करून घेणे हि सुनिल तटकरेंची वृत्ती असून गेली २० ते २५ वर्षात विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम ते करीत असून त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल हे निर्विवाद सत्य आहे. प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनीधींना सत्तेचा गैरवापर करीत पोलीस यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यास भाग पाडणे या विरोधात भाजप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पेणमध्ये आयोजित निषेध मोर्चा प्रसंगी दिला.
१६ ऑक्टोबर रोजी पेण न. प. च्या स्थायी समितीच्या सभेत नरदासचाळ येथील सांडपाण्याचा निचरा समस्या निवारण प्रश्नी गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला यावरून मुख्याधिकारी यांनी गटनेत्याच्या विरोधात पेण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला परंतु पोलीस यंत्रणेने कोणतीही शहानिशा न करता ३५३ गुन्हा दाखल केल्याने जनतेच्या प्रश्नासंबंधी जाब विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींनवर गुन्हा दाखल करणे हे निषेधार्ह असून या विरोधात आज २९ ऑक्टोबर रोजी वैकुंठ निवास येथून निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या वेळी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे न. प. कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर, आमदार निरंजन डावखरे, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, सभापती मोनिका महानवर, सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, भाजप जिल्हाध्यक्ष अँड. महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, रिपाई कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, चिटणीस बंडू खंडागळे, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले कि, सुडाचे राजकारण करत असताना तटकरे यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकल्याने पोलिसांनी सारासार विचार न करता रात्रौ १२.३० वाजता माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली हे निव्वळ रविशेठ पाटील यांना बदनाम करण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो हे तटकरेंनी या घटनेवरुन सिद्ध करून दाखविले असून या प्रकरणाचा जाब येत्या विधानसभा अधिवेशनात सरकारला विचारणार असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले.
तटकरेंशी राजकीय मैत्री करणारे इतर पक्षांचेही अस्तित्व संपविण्याचे काम ते करीत असून शिवसेनेचे जिल्ह्यात ३ आमदार असून सुद्धा पालकमंत्री पद राष्ट्रवादीला गेले आहे, तसेच शासकीय कार्यक्रमाच्या आमंत्रांवरून शिवसेनेच्या आमदारांनी तक्रार दिली असून ही शिवेसनेसाठी शोकांतिका आहे. आगामी काळात तटकरे भाजपाला १ नंबर राजकीय क्षत्रू मानतात आम्ही पण तटकरेंना जशास तसे उत्तर देऊ असे शेवटी दरेकर यांनी स्पष्ट केले.
हा प्रश्न फक्त एका नगरपालिकेशी मर्यादित नाही तर रायगड जिल्ह्याच्या भविष्याशी निगडित आहे. भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे आणि सुदैवाने विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा याच रायगडच्या मातीतला आहे त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारची दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात हे सरकार सत्तवेर आले तेव्हाच लोकशाहीचा खून झाला. शिवसेना भाजपच्या युतीला लोकांनी मत दिली असून देखील हे अनैसर्गिक सरकार स्थापन केल. श्रीवर्धन बँक बुडविली, गोरेगाव अर्बन बँक बुडवली गेली, पेण अर्बन बँक बुडाली हे सर्व बँक बुडवणारे तटकरे यांचे साथीदार असल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केला. तटकरे यांच्या सुतार वाडी ची झाडाझडती तुम्ही करणार आहात का असा सवालही त्यांनी रायगड पोलिसांना यावेळी केला.
या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता तसेच पेणमधील व्यापारी, फळ विक्रेते, दुकानदार, भजीवाले यांनी दुकाने बंद ठेऊन बंदमध्ये सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button