ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

Positive initiative: तळवडे-सहयोगनगरमध्ये प्रलंबित रस्त्यांचे काम अखेर मार्गी!

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार, सदनिकाधारक ६०० कुटुबियांना मिळाला दिलासा

पिंपरीः तळवडे येथील सुमारे ६०० सदनिकाधारकांना रस्त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, या रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आणि एका दिवसात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी करण्यात आली आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला त्रिवेणीनगर- तळवडे रोडजवळील नवीन सहयोगनगर, शिवशंकर सोसायटी, तळवडे- त्रिवेणीनगर या रस्त्याचे काम रखडले होते. परिणामी, या भागातील ६०० कुटुंबांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागता होता.

शिवशंकर कॉलनी येथील विश्वास खांडवे म्हणाले की, रस्त्याअभावी स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत होता. या भागात सुशिक्षीत लोकांची संख्या जास्त आहे. रस्त्याच्या कामासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, यश मिळत नव्हते. अखरे आमदार महेश लांडगे यांच्याकडे याबाबत मागणी केली. त्यामाध्यमातून रस्त्याचे काम मार्गी लागत आहे. यापूर्वीही ड्रेनेजची समस्या आमदार लांडगे यांच्या माध्यमातून निकालात निघाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक विशाल शेवाळे, विश्वास मोढवे, हनुमंत शिंदे, तानाजी साळुंखे, बाळकृष्णा भोसले आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघात नागरी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सोसायटीधारक आणि स्थानिक नागरिकांना रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाबाबत असलेल्या तक्रारी तात्काळ सोडवण्यात येत आहेत. तळवडेतील सहयोगनगर येथे शिवशंकर कॉलनीतील चार रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. लवकरच या रस्त्यांचे काम पूर्ण करुन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहेत.

-महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button