Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील कुस्तीपटूंचं आंदोलन मागे; साक्षी मलिकचं ट्वीट चर्चेत

Brijbhushan Singh : भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गेल्या ५ महिन्यांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू होतं. दरम्यान, न्यायालयात चार्जशीट दाखल झाल्याने रस्त्यावरील लढाई थांबवण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आहे. याबाबत कुस्तीपटू साक्षी मलिकने ट्वीट करत माहिती दिली आहे.

साक्षी मलिकने म्हटलं आहे की, कुस्तीपटूंची ७ जूनला सरकारबरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत १५ जूनला चार्जशीट दाखल केलं आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरू राहिल.

हेही वाचा – ‘..तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील’; शरद पवारांची खोटक टीका

कुस्ती महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. कुस्तीसंघाची ११ जुलैला निवडणूक होऊ शकते. सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीची आम्ही वाट पाहू, असं साक्षी मलिकने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button