राहुल गांधींच्या फ्लाईंग किस वरून महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल!
![Women's Commission Chairperson Swati Maliwal criticizes Central Government over Rahul Gandhi's flying kiss](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/rahul-gandhi-and-smriti-irani-780x470.jpg)
नवी दिल्ली : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी सभागृहाच्या बाहेर जाताना फ्लाईंग किस केला असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – काय आहे विदर्भातील कलावतीची कहाणी?
हवा में फेंकी हुई एक कथित flying kiss से इतनी आग लग गई। 2 row पीछे एक आदमी बृजभूषण बैठा हुआ है। जिसने ओलम्पियन पहलवानों को कमरे में बुलाके छाती पे हाथ रखा, कमर पे हाथ रखा और यौन शोषण किया। उसके करे हुए पे ग़ुस्सा क्यों नहीं आता?
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) August 9, 2023
स्वाती मालिवाल यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. हवेत फेकलेल्या एका कथित फ्लाईंग किसने इतकी आग लागली आहे. पण दोन रांगा मागेच एक व्यक्ती बृजभूषण बसलाय. त्याने ऑलिम्पिक कुस्तीपटूंना खोलीत बोलवून त्यांच्या छातीवर हात ठेवला. कमरेत हात घातला. त्यांच लैंगिक शोषण केलं होतं. त्याने जे केलं त्यावर राग का येत नाही? असा सवाल स्वाती मालिवाल यांनी उपस्थित केला आहे.