Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये?

मुंबई : राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता असल्यामुळे हे अधिवेशन नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबतच्या सूचना मंत्रालयीन अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा –  75 तासांत 303 नक्षलींचे आत्मसमर्पण, नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत सरकारला मोठे यश

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे घेण्यात येते. यावर्षी 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, 31 जानेवारी 2026 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निवडणुकांसाठी आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button