उद्धव ठाकरे यांचं शिवसेना पक्षप्रमुखपद राहणार का? याबाबत आज महत्वाची सुनावणी
![Will Uddhav Thackeray remain Shiv Sena party chief? Important hearing regarding this today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/uddhav-thackeray-780x470.jpg)
२३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुख पदाची मुदत संपणार
मुंबई : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा शिवसेना पक्षासंदर्भात महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगासमोर पार पडणार आहे. विशेष म्हणजे केवळ शिवसेना पक्षच नव्हे तर उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्ष प्रमुख पदा राहणार की नाही, यासंदर्भाची महत्त्वाची सुनावणी आज आयोगासमोर होणार आहे.
आज धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष कुणाचा, यावर महात्वाचा निर्णय अपेक्षित आहे. दुपारी 4 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगात यासंदर्भात युक्तिवाद सरू होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजची सुनावणी सर्वाधिक महत्त्वाची आहे. कारण येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाची मुदत संपत आहे. त्यासाठीच शिवसेना ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. आयोगासमोर खटला सुरु असताना ही परवानगी मिळते की नाही, यावर उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद राहणार की जाणार, हे अवलंबून आहे.
यापुर्वी शिवसेना पक्षाच्या खटल्यात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी महत्वाची मागणी केली. सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेविषयीचा खटला सुरू आहे. त्याचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाविषयीची सुनावणी घेऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाचे वकील महाशे जेठमलानी यांनी केला आहे.
तसेच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पक्ष प्रमुख पदाविषयी महत्वाचा युक्तिवाद केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी अवैधरित्या पक्षप्रमुख पद स्वत:कडे ठेवल्याचा दावा आयोगासमोर करण्यात आला.