कसब्यात भाजपला बसणार मोठा धक्का? जाणून घ्या मतांचं गणित
![Will BJP get a big blow in the town?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/ravindra-dhangekar-and-hemant-rasne-780x470.jpg)
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा निकाल उद्या म्हणजेच २ मार्चला लागणार आहे. कसबा निवडणुकात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत दुहेरी होणार असं बोललं जात आहे. मतदानाच्या दिवशी देखील भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र मतमोजणीपूर्वीच एक एक्जिट पोल समोर आला आहे.
‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेचा एक्जिट पोल प्रसिद्ध झाला आहे. यानुसार मतमोजणीपूर्वीच एक आकडेवारी समोर आली आहे. यानुसार भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. एक्जिट पोल नुसार काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना ७४ हजार ४२७ इतकी मतं मिळतील अशी शक्यता आहे. तर भाजपच्या हेमंत रासने यांना ५९ हजार ३५१ इतकी मतं मिळतील असा प्राथमिक अंदाज आहे.
‘द स्ट्रेलेमा’च्या रिपोर्टनुसार कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर १५ हजार ७७ मताधिक्यांनी विजयी होतील, असा अंदाज वर्तवला गेला आहे.
दरम्यान, कसबा मतदारसंघात एकूण मतदान २ लाख ७५ हजार ६७९ इतके आहे. मात्र १ लाख ३८ हजार १८ इतके झाले आहे. म्हणजेच कसबा विधानसभा मतदारसंघात ५०.०६ टक्के मतदान झालं आहे.
हा सर्वे द स्टोलिमा या संस्थेचा आहे. याबाबत आम्ही सर्वे केलेना नाही. तसेच द स्ट्रेलिमाच्या सर्वेबाबत कुठलाही दावा करत नाही.