breaking-newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

इंडिया आघाडीचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष जोरदार तयारी करत आहेत. आज दुपारी तीन वाजता इंडिया आघाडीची नवी दिल्ली येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, इंडिया आघाडीचा चेहरा आता ठरवावा लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची एकत्रित बैठक झाली नाही. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील अनेक प्रादेशिक पक्ष सामील होते. त्यामुळे या कालावधीनंतर इंडियाची बैठक होत आहे. तीन राज्यातील निवडणुकांच्या निकालावर चर्चा होणं आवश्यक आहे. ती चर्चा या बैठकीत होईल. जानेवारीपासून निवडणुकीचं वर्ष सुरू होईल. एप्रिल आणि मे महिन्यात वेळापत्रकानुसार निवडणुका होतील. त्यानुसार तयारीला लागावं लागेल. बाकीच्यांच्या सूचना येतायत त्यावर आमची मते आम्ही मांडू. बैठकीनंतर या विषयावर बोलणं अधिक योग्य राहील.

हेही वाचा – ‘अनेक दिवसांपासून मी जरांगेंच्या सोबत’; अंतरवाली सराटी घटनेतील आरोपीची प्रतिक्रिया

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा कोण असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, मोदींच्या समोर चेहरा हा विषय असला तरीही या आघाडीला समन्वयक, निमंत्रक आणि शक्य असेल तर एखादा चेहरा ठरवता येतो का याचा विचार कारावा लागेल.

आम्ही एकत्र आलो आहोत. कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे. ज्या पद्धतीने खासदारांचं निलंबन झालं. महाराष्ट्रातील विधिमंडळातील चित्र पाहिलंत, हे बघितल्यानंतर देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजतेय का हा प्रश्न आहे. कोणाच्याही डोक्यात नेतृत्त्वाची हवा नाहीय. देशातील लोकशाही जगली तर देश जगेल. ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हाणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button