breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

कोणी विश्वासघात केला? भाजपा खासदाराचा सवाल, पराभवानंतर अंतर्गत कलह समोर

BJP Election Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल समोर आलेत. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पण भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. भाजपाच्या नेतृत्वाखाली NDA आघाडीकडे बहुमताचा आकडा आहे. विरोधी पक्ष याला नरेंद्र मोदींचा पराभव ठरवत आहेत. या दरम्यान भाजपाच्या एका खासदाराने काही प्रश्न उपस्थित केलेत. कुठल्यातरी नेत्याने विश्वासघात केल्याचा आरोप त्याने केलाय. “उत्तर प्रदेशात सध्या जी राजकीय स्थिती आहे, त्याने मला दु:ख झालय. या परिस्थितीपासून मी स्वत:ला वेगळ करु शकत नाही. यूपीमध्ये आमच्या पक्षाला कमीत कमी 75 जागा मिळायला पाहिजे होत्या. आम्ही कसे मागे राहिलो?. आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने या बद्दल चिंतन करणं गरजेच आहे. गाव खेडं आणि शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची चर्चा होती. देशासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. उत्तर प्रदेशसाठी अनेक काम केली आहेत” असं भाजपा खासदार हरनाथ सिंह म्हणाले.

हेही वाचा – नागरिकांसाठी खुशखबर..! महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती 

“पंतप्रधान मोदींनी जनतेपर्यंत अनेक लाभदायक योजना पोहोचवल्या. मात्र, तरीही कुठे चुकलं? यावर सखोल चिंतन करणं गरजेच आहे. भले, आमच्या जागा कमी झाल्या असतील, पण लोकांना पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. एनडीए सरकार बनवणार. ज्या सीटवर आम्ही हरलो, तिथे काय झालं? यावर पक्ष नेतृत्वाने विचार करण्याची गरज आहे. कुठल्या आमदाराने किंवा मोठ्या नेत्याने पक्षविरोधी काम केलं असेल, याचाच अर्थ त्याने पक्षासोबत विश्वासघात केलाय” असं हरनाथ सिंह म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक झाली. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 14 पक्षांचे 21 नेते सहभागी झाले होते. यात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार किंग मेकर ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात बिहारमधून कोणाला मंत्री पद मिळणार? याची चर्चा आहे. यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. JDU ची नजर रेल्वे, कृषी मंत्रालयासह बिहारसाठी विशेष पॅकेजवर आहे. JDU कडून मंत्रिमंडळात तीन पदांची मागणी होऊ शकते. रेल्वे मंत्रालयावरुन चिराग पासवान आणि जेडीयूमध्ये ओढाताण होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button