Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पंतप्रधान पदाची ऑफर कोणत्या नेत्याने दिली होती? नितीन गडकरी म्हणाले..

Nitin Gadkari | लोकसभा निवडणूक निकालानंतर मला पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षाच्या एका नेत्याने दिली होती, पण मी ती नाकारली, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. पण ही ऑफर कोणत्या नेत्याने दिली? याबाबत नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पंतप्रधान पदाची ऑफर कोणी दिली होती? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आजच नाही तर, मला खूप लोकांनी अशी ऑफर दिली आहे. माध्यमांतही अशी चर्चा होत असते. मी ज्या संदर्भात या ऑफरविषयी सांगितलं होतं की, आपल्या देशाची समस्या विचार भिन्नता नसून विचार शुन्यता आहे. मी पत्रकारांना पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात हे सांगितलं होतं. मी आणीबाणीनंतर राजकारणात आलो आहे. मी माझ्या विचारधारेशी कधीच तडजोड करणार नाही. त्यामुळे पंतप्रधान पदाची ऑफर मला जेव्हा दिली तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही मला का पंतप्रधान बनवू इच्छिता? पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाहीय. अशा ऑफर मला निवडणुकी आधी आणि नंतरही आल्या. पण त्यांच्या ऑफरवर विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण मी माझ्या विचारधारेशी तडजोड करत नाही.

हेही वाचा    –      ‘मोदी शक्तिशाली आहेत, पण देव नाहीत’; अरविंद केजरीवाल यांची टीका 

शरद पवार, उद्धव ठाकरे की सोनिया गांधी ऑफर कोणी दिली होती? तुमचे सर्वपक्षीय संबंध आहेत, त्यामुळे कोणी ऑफर दिली? केंद्रातील नेत्याने ऑफर दिली होती की राज्यातील नेत्याने ऑफर दिली होती? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, मी चौकात उभा नाहीय. ऑफर कोणी दिली हे सांगणं उचित नाही. मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीय. तुम्ही कितीही विचारलंत तरीही मी सांगणार नाही. मी कधी कोणाकडे काही मागायला गेलो नाही. मी आहे त्यात मला समाधान आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button