ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

विधान परिषदेत चर्चेदरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनमध्ये जोरदार खडाजंगी

परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करताना व्यक्तीगत पातळी गाठली

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आज एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे परस्परांचे कट्टर विरोधक समजले जातात. आधी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांचं वर्चस्व होतं, तेव्हा ते भाजपमध्ये होते. गिरीश महाजन यांचं राजकीय वजन वाढू लागल्यानंतर खडसेंची भाजपमधील ताकद हळूहळू कमी होत गेली. अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती. आता शरद पवार गटात असलेले एकनाथ खडसे विधान परिषदेत आमदार आहेत. विधानसभा, लोकसभेचीच नव्हे, जिल्ह्याच्या राजकारणात कोणतीही निवडणूक असली तरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन ती जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावतात.

आता विधान परिषदेत एका चर्चेदरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अगदी व्यक्तीगत पातळीवरचे आरोप-प्रत्यारोप झाले. जळगावात अवैध धंदे कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहेत? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. त्यावर गिरीश महाजन यांनी खडसेंच्या कुटुंबातील लोकांना तीन वर्ष जेलमध्ये काढावी लागलली असं उत्तर दिलं.

सरकारने बांगड्या घातल्यात का?
वाळू माफियाची प्रकरण घडत आहेत, यामागे कोणाचा हात आहे? सरकार पाच वर्ष तुमचं होतं, सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? सरकारने बांगड्या घातल्यात का? वाळू माफियासंदर्भात तुम्ही बांगड्या घातल्या आहेत का? का कारवाई करता येत नाही? कापसाला का भाव देत नाही? मोठमोठ्या घोषण करता, सरकार कापसाला का भाव देता येत नाही, कापसासाठी शेतकरी मरतोय, असं एकनाथ खडसे म्हणाले. का तोंड काळ केलं?

त्यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. चाललं काय, काय बरोबर चाललय. तुम्ही रॉयल्टी चोरी करता, स्टॅम्प ड्युटीमध्ये चोरी करता. घरची लोकं तीन-तीन वर्ष बसलेत जेलमध्ये, अजून काय इथे छाती ठोकपणे बडबड करायची, अहो चोऱ्या कोणी केल्या? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोंड काळ केलं? मी तर म्हणतो नार्को टेस्ट करा,असे व्यक्तीगत आरोप गिरीश महाजन यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button