Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई | जर्मन कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ महाराष्ट्रात ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोसल मिडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या गुंतवणकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार मिळणार आहेत.

हेही वाचा    –      केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरवणार

जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा झाली. यावेळी मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर, पॉलिटिकल ऑपरेशन्स-एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्रीमती मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, प्रदेश ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक मार्टिन शुल्झ, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते अशी पोस्ट उदय सामंत यांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button