Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम’; मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुख, अधिक सक्षम, तंत्रशुद्ध व सेवाभावी बनवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वेगवेगळ्या केडरवर काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षणासंबंधी सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला राज्यातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्य, आरोग्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षण हा आरोग्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी, चांगली वागणूक देण्यासाठी, कामकाजात गतिमानता, तांत्रिक कौशल्य येण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढण्यासाठी प्रशिक्षण हा महत्त्वाचा घटक असल्याने, आरोग्य विभागात विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक व प्रशासकीय प्रशिक्षण देणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य’; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

यावेळी एसईआरसीएच, पीएचएफआय, आयएमएमएएसटी, इनिशिएटिव्ह ऑफ चेंज, ताम्हिणी घाट पुणे या प्रशिक्षण संस्थांनी सादरीकरण केले. या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे आपले अनुभव सांगितले. प्रशिक्षणामुळे टेक्निकल स्किल, इथिकल व्हॅल्यू, टीम मॅनेजमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लीडरशिप मॅनेजमेंट, व कॉन्फिडन्स वाढल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाचा फायदा झाला असून, नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल असेही सांगितले.

रुग्णालयातील सर्वसाधारण व्यवस्थापन, रुग्णाला दिली जाणारी वागणूक, उपचारातील आधुनिक तांत्रिक कौशल्ये,कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह सर्व आधुनिक घटकांचा शिक्षणात समावेश असावा. तसेच प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘मास्टर ट्रेनर’ बनून इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button