Pimpri-Chinchwad : माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तीघांना अटक
![Three inn criminals arrested in connection with conspiracy to kill former corporator Shekhar Ovhal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Pimpri-Chinchwad-3-780x470.jpg)
पिंपरी : राष्ट्रवादी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांना पिस्तूल व दोन राउंडसह अटक केली. माथाडी कामावरून झालेल्या वादानंतर ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने पिस्तूल मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी किशोर भोसले (वय ३१, रा. पुनावळे गावठाण) आणि अमित दत्तात्रय पाटूळे (वय २३, शिंदेवस्ती चौक, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार पुनावळे येथील स्मशानभूमी येथे येणार असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी पिस्तूल पुनावळे येथील अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले याच्या सांगण्यावरून तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याच्याकडून आणल्याचं सांगितलं.
हेही वाचा – पंकजा मुंडेंनंतर ‘या’ नेत्याला बीआरएसकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर
पोलिसांनी पिस्तुल संशयीत आरोपी गोरगले यास अटक केली. त्यानंतर संशयीत आरोपींकडे पिस्तूल आणण्याचा उद्देश विचारला असता, त्यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांच्याशी माथाडीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यासाठी पिस्तूल आणल्याची कबुली दिली.