Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“धर्माला अफूची गोळी म्हणणारेच या आंदोलनात अग्रेसर…”, नाशिकमधील वृक्षतोडीच्या राजकारणावर मुख्यमंत्री संतापले

मुंबई: नाशिकमधील तपोवनमधील वृक्षतोडीबाबतचे राजकारण दुर्देवी असून धर्माला अफूची गोळी म्हणणारेच या आंदोलनात अग्रेसर आहेत. तपोवनातील झाडे गेल्या चार- पाच वर्षातील असून झाडेही वाचली पाहिजेत आणि गुरुग्रामही झाले पाहिजे असा मध्यममार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

राष्ट्रीय शेअर बाजारात फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, ‘ मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री उपस्थित होत्या.

दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी जसा उत्स्फूर्त सहभाग दिला आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आहे.कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यात येईल असे त्यांनी फडणवीस यांनी यावेळी सांगितले. नाशिकमधील वृक्षतोडीबाबत बोलताना कुंभमेळा हा सनातन सस्कृतिचे प्रतिक असून यात नदी,वृक्ष संवर्धन महत्वाचे आहे. झाडे तोडणे कुणालाही आवडणारे नाही. मात्र तपोवनात पूर्वी झाडे नव्हती. ही जागा साधुग्रामसाठीच राखीव असून सन १७-१८मध्ये महापालिकेने येथे वृक्षारोपण केले होते. तीच ही झाडे आहेत. प्रयागराजचा कुंभमेळा १५ हजार हेक्टरवर झाला होता. तर नाशिकचा कुंभमेळा ३५० एकर जागेवर होणार असून या वादात मध्यम मार्ग काढला जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा –  नवी नियमावली करा, पुढील निवडणुकांसाठी न्यायालयाचे आयोगाला आदेश

दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी जसा उत्स्फूर्त सहभाग दिला आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आहे.कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यात येईल असे त्यांनी फडणवीस यांनी यावेळी सांगितले. नाशिकमधील वृक्षतोडीबाबत बोलताना कुंभमेळा हा सनातन सस्कृतिचे प्रतिक असून यात नदी,वृक्ष संवर्धन महत्वाचे आहे. झाडे तोडणे कुणालाही आवडणारे नाही. मात्र तपोवनात पूर्वी झाडे नव्हती. ही जागा साधुग्रामसाठीच राखीव असून सन १७-१८मध्ये महापालिकेने येथे वृक्षारोपण केले होते. तीच ही झाडे आहेत. प्रयागराजचा कुंभमेळा १५ हजार हेक्टरवर झाला होता. तर नाशिकचा कुंभमेळा ३५० एकर जागेवर होणार असून या वादात मध्यम मार्ग काढला जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.

यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनीही खुल्या वित्तीय बाजारातून बॉण्डद्वारे निधी उभारला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ला गुंतवणूकदारांकडून मिळालेला चौपट प्रतिसाद ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक सक्षमता, रेटिंग आणि पारदर्शक प्रक्रियेची पावती असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील १५ महानगरपालिका अशा क्षमतेच्या असून नियमन प्रक्रियेतून विशिष्ट पात्रता आणि नियामक मान्यता पूर्ण करून विकासासाठी निधी उभारू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

खुल्या बाजारातून उभारलेल्या निधीच्या आधारे केंद्र सरकारकडून पायाभूत विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा मार्गही सुलभ झाला आहे. तसेच एनएसई प्रक्रियेमुळे २६ कोटी रुपये प्रोत्साहन निधी मिळणार असून याद्वारे महानगरपालिकेवरील व्याजभार शून्य टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या क्षमतेस चालना देण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजारच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात निधी उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात महापारेषण, त्यानंतर महावितरण आणि महानिर्मिती या देशातील मोठ्या वीज कंपन्यांचे सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button