पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
![This year's Lokmanya Tilak National Award has been announced to Prime Minister Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Prime-Minister-Narendra-Modi-780x470.jpg)
पुणे : लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गैरव केला जाणार आहे. १ ऑगस्ट २०२३ रोजी हा गौरव सोहळा पुण्यात संपन्न होणार आहे.
टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पुरस्काराची घोषणा केली आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
हेही वाचा – World Cup 2023 : पाकिस्तानचा विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार!
१ ऑगस्टला लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्काराने गैरविले जाणार आहे. यंदा या पुरस्काराचे ४१ वे वर्ष आहे. तसेच या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.