breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

‘सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही’; मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले…

Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. त्या अनुषंगाने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. मतमोजणीसाठीच्या तयारीची त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, अशीही माहिती त्यांनी दिली.

राजीव कुमार म्हणाले की, मतदानाच्या जागृतीसाठी आतापर्यंत आम्ही १०० प्रेस नोट काढल्या आहेत आणि ३१२ मिलियन महिला मतदारांनी मतदान केलं आहे. १३५ ट्रेन या निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी चालत होत्या, १६९२ कर्मचारी हेलिकॉप्टरने कर्मचारी पोहोचले. देशातील असा कुठलाही कोपरा नाही की तिथे निवडणूक कर्मचारी पोहोचले नाहीत. यांच्याबद्दल जेंव्हा कोणी आरोप करतात तेव्हा त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील, याचा विचार करावा.

हेही वाचा   –  एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर आज शेअर बाजारात विक्रमी उसळी 

पुढे बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, जम्मू काश्मीरमधे ५८.५८ टक्के मतदान झालं आहे. जम्मू काश्मीरमधे विधानसभेसाठी आता आम्ही लवकरच मतदान घेणार आहोत. मणिपूरमध्ये ९४ स्पेशल पोलिंग बूथ बनवले होते, ही आपल्यासाठी सक्सेस स्टोरी आहे. २ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर कुठलाही हिंसाचार न होता निवडणुका झाल्या आहे. यापूर्वी निवडणूकीमध्ये किती हिंसाचार व्हायचे, हे आपण पाहिले होते. पैसे, दारू वटल्याच्या घटना घडत होत्या, यावेळी एकही मोठी घटना समोर आली नाही.

मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीबद्दल बोलताना राजीव कुमार म्हणाले, मतमोजणीदरम्यान जिल्हाधिकारी यांच्यावर कुठेही दबाव टाकू नये यासाठी ६ राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना हटवलं आहे. राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना त्या-त्या पदावरून दूर केलं आहे. मतमोजणी दरम्यान काय-काय काळजी घ्यायची आहे त्याची प्रोसेस ठरली आहे. १०.३० लाख बूथ आहेत, प्रत्येक हॉलमध्ये ४ टेबल, प्रत्येक पक्षाचा पोलिंग प्रतिनिधी असेल.. ही सगळी प्रोसेस ७०-८० लोकांमध्ये होत आहे, असं त्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button