Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

कसब्यातील भाजप आणि काँग्रेस उमेदवारांची संपत्ती कोट्यावधीमध्ये

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसकडून आपले उमेदवारी दाखल केली. भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. कसब्यात या उमेदवरांमध्ये निवडणुक होणार आहे. या उमेदवारांची संपत्ती कोट्यावधीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी उमेदवारी दाखल करताना आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये रासने कुटुंबियांकडे १४ कोटी ७३ लाख ३९ हजार ७२० रूपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर ३ कोटी ८० लाख ५६ हजार रूपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे एक कार आणि एक दुचाकी आहे. रासने यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले, पुणे जिल्ह्यातील गोरड, हवेलीतील म्हाळुंगे, रत्नागिरी जिल्ह्यातील बोरघर, टाळूसरे येथे जमिनी आहेत.

काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारी दाखल करताना आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण ८ कोटी ३६ लाख १० हजार रूपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. दोन दुचाकी, २५ तोळे सोने आहे. त्यांच्या नावावर ३५ लाख ७३ हजार रूपयांचे कर्ज, तर पत्नीच्या नावावर ३२ लाख ८ हजार रूपयांचे कर्ज आहे. धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. दौंड तालुक्यात शेती असून कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे. तर त्यांच्यावर नऊ खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. ही माहिती उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडलेल्या शपथपत्रावरून समोर आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button