दंगल आणि आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवा, मंत्री नितेश राणेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Nitesh Rane : जिहादच्या विरोधात कोण आवाज उचलत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोणी हिंमत करू नये. दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात. दंगल आणि आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवा असतो असं राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. मंत्री राणे आज सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी यवत राडा प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, हिंदूंच्या सभांमध्ये इतर कोणत्याही धर्माचा द्वोष केला जात नाही. जर कोणी हिंदूंची बाजू घेत असेत तर कोणाला ऍलर्जी होण्याचं कारण नाही. जिहादाच्या विरोधात कोण आवाज उचलत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोणी हिंमत करु नये. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नितेश राणे म्हणाले.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात. मालेगावमध्ये जे सिद्ध झालं आहे तेच यवतमध्ये आहे. दंगल आणि आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवा असतो. हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी पडळकर यांच्यासारखे हिंदू कार्यकर्ते एकत्र येत असतील तर त्यांना माझा पाठिंबा आहे. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा – तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहाळ; मंत्रोपचाराने देवीची शक्ती काढल्याचा खबळजनक दावा
तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणे यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मतांच्या चोरीचा आरोप राहुल गांधींनी का लावला नाही? तेव्हा मिरची का लागली नाही ? एक एक राज्य हातातून निघून जातंय पुढील निवडणुकात भाजपा आणि एनडीएची सत्ता येणार आहे त्याची भीती असल्यामुळे राहुल गांधी निवडणूक आयोगावर शेमड्या सारखे आरोप करत आहेत.
कर्नाटक तेलगना निवडणुकीनंतर का आरोप लावला नाही. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ह्याला राहुल गांधी म्हणतात. अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.