ठाकरे, पवार मविआचे उमेदवार नाना काटेंसाठी प्रचारात उतरणार!
![Our victory is certain, said Nana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/nana-kate-2-780x470.jpg)
बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्याबद्दल ठाकरे काय भूमिका घेणार?
पिंपरी : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. दोन्ही मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीकडून बड्या नेत्यांनी प्रचारात सहभाग नोंदवला आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चिंचवडमध्ये सभा घेणार आहेत.
आज चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन येथे महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा पार पडणार आहे. यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी राहताना दिसत आहे.
शिवसेनेतून बंडखोरी केलेले उमेदवार राहुल कलाटे यांच्याबद्दल आदित्य ठाकरे काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.