breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ठाकरे गटाच्या लोकसभेच्या २३ जागा ठरल्या! ‘या’ जागा लढण्यावर ठाम

मुंबई : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. इंडिया आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी या २३ जागा लढण्यावर ठाम आहे. इतकेच नाहीतर महाविकास आघाडीचा लोकसभेचा पहिल्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरु आहे.

शिवसेना २३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १५ आणि काँग्रेस १० असा हा फॉर्म्युला आहे. दुसरीकडे जागावाटपावरुन वाद होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या वचिंत आघाडीनेही एक फॉर्म्युला महाविकास आघाडीला दिला आहे. वंचितने १२-१२-१२-१२ असा फॉर्मुला महाविकास आघाडीला दिलाय.

त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि वंचित या सर्वांनी प्रत्येकी १२ जागा लढवाव्या असं आंबेडकरांचं म्हणणं आहे. पण शिवसेनेना दावा केलेल्या २३ लोकसभा मतदारसंघात सध्या कोणते खासदार आहेत.? कोणत्या पक्षाने तिथे विजय मिळवलाय ते पाहूयात..

हेही वाचा  –  अजित पवरांकडे ८० गाड्यांसाठी १५-१६ कोटी कुठून आले? अंजली दमानियांचा सवाल 

सध्या कोणत्या मतदारसंघात कोण खासदार?

रामटेक-कृपाल तुमाणे (शिंदे गट), बुलढाणा-प्रतापराव जाधव (शिंदे गट), यवतमाळ वाशिम-भावना गवळी (शिंदे गट), हिंगोली-हेमंत पाटील (शिंदे गट), परभणी-संजय जाधव (शिंदे गट), जालना-रावसाहेब दानवे (शिंदे गट), छत्रपती संभाजीनगर-इम्तियाज जलील (एमआयएम), नाशिक-हेमंत गोडसे (शिंदे गट), पालघर- राजेंद्र गावित (शिंदे गट), कल्याण-श्रीकांत शिंदे (शिंदे गट), ठाणे-राजन विचारे (ठाकरे गट), मुंबई उत्तर पश्चिम-गोपाळ शेट्टी (भाजप), मुंबई दक्षिण- अरविंद सावंत (ठाकरे गट), मुंबई ईशान्य-मनोज कोटक (भाजप), मुंबई दक्षिण मध्य-राहुल शेवाळे (शिंदे गट), रायगड-सुनिल तटकरे (राष्ट्रवादी-अजित पवार गट), रत्नागिरी सिंधुदुर्ग-विनायक राऊत (ठाकरे गट), मावळ-श्रीरंग बारणे (शिंदे गट), शिर्डी- सदाशिव लोखंडे (शिंदे गट), धाराशिव-ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट), कोल्हापूर-संजय मंडलिक (शिंदे गट), हातकणंगले-धैर्यशील माने (शिंदे गट), अकोला-संजय धोत्रे (भाजप).

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button