‘..म्हणून अमित शहांनी कसबा आणि चिंचवडचा प्रचार करणं टाळलं’; रोहित पवारांचा टोला!
![Tejashwi Surya said that Laxman Jagtap developed development just like Prime Minister Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/rohit-pawar-and-amit-shah-780x470.jpg)
कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपा पराभूत होणार!
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचा प्रचार करणं टाळलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अमित शहा यांना टोला लगावला आहे.
अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनितिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह साहेब. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा!, असा टोला रोहित पवार यांनी अमित शहांना लगावला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या ट्विटनंतर अमित शहांनी कसबा आणि चिंचवड मतदारसंघात प्रचार का टाळला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कसबा आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक २६ फेब्रुवारीला येणार आहे.