TOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

तळवडे आगप्रकरणाची चौकशी करा, अजित गव्हाणे यांची मागणी

महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पिंपरीः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी चौकशीची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाच्या कारभारावर शंका व्यक्त केली आहे. यावेळी माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर राष्ट्रवादीे पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्य गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांनी तळवडे येथील आगीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या प्रशासनास सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागलीय. तळवडे येथील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. कंपन्यांच्या ऑडिटकडे महापालिका प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असून तळवडेतील आगीप्रकरणी जबाबदार धरून महापालिकेच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली असताना उपमुख्यंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात तळवडे येथील आगीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असे एक्सवर म्हटले आहे.

या बाबत ट्विट द्वारे अजित पवार यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार सुरु असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी प्रार्थना करतो.

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्ण उपाययोजना केल्या जातील, असे अजित पवार यांनी ट्विट केले आहे.

महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
तळवडे आगप्रकरणी घटनास्थळाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भेट दिली. मृतांच्या नातेवाईंकांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च देण्यात यावा. अशी मागणी करत महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button