भाजपला मोठा धक्का! सुर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश

मुंबई | लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्यातील राजकीय वारे आता महाविकास आघाडीकडे वाहू लागले आहे. यातच भाजपच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सुर्यकांता पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इत्यादी नेते उपस्थित होते.
सुर्यकांता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. सुर्यकांता पाटील यांची नांदेड जिल्ह्यात डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे.
हेही वाचा – ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ म्हणजे काय? जाणून शुभ मुहूर्त, पूजेची वेळ
महत्त्वाचे म्हणजे सूर्यकांता पाटील यांनी यापूर्वी अनेक वर्ष शरद पवार यांच्याबरोबर काम केलं आहे. २०१४ पूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत्या. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.





