‘एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’; सुरेश धस यांचे गंभीर आरोप

Suresh Dhas | बीडमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींबाबत आणखी काही धक्कादायक माहिती आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर आणली आहे. या संदर्भात आमदार धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आरोपी विष्णु चाटेच्या नावावर ४६ कोटींची बिले काढली असून परळी नगरपरिषदेचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी केली असल्याचे धस म्हणाले.
सुरेश धस म्हणाले की, एक पोलीस अधिकारी १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी आहे. त्याचे स्वत:चे १५ जेसीबी आणि १०० हायवा आहेत. परळी थर्मलमध्ये काही अधिकारी २० वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करत आहेत. त्या थर्मलमधील अवैध राखेचे साठे जप्त केले पाहिजेत. यामध्ये कोणकोणाची नावे आहेत याची यादी मी पोलिसांना देणार आहे.
हेही वाचा : मौनी अमावस्येला महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी; अमृत स्नान रद्द
परळी नगरपरिषदेचे स्पेशल ऑडिट केले पाहिजे. आरोपी विष्णु चाटेच्या नावावर ४६ कोटी रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. तसेच एकाच रस्त्यावर पाचवेळा बिले काढली गेली, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.





