राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; सुरत कोर्टाने याचिका फेटाळली
राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार नसल्याचे स्पष्ट
![Surat court dismisses Rahul Gandhi's appeal for stay on conviction in defamation case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/rahul-gandhi-1-780x470.jpg)
दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका सुरत कोर्टाने फेटाळून लावली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी राहुल गांधी यांनी सुरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणी राहुल गांधी यांनी याचिका सुरत कोर्टाने फेटाळली आहे.
राहुल गांधींच्या याचिकेवर आज सूरत कोर्टात सुनावणी झाली. मात्र, कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची शिक्षा कायम आहे. २०१९ मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत कोर्टानं २३ मार्चला दोषी ठरवले होते.
त्यानंतर काही दिवसांत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांना खासदारकी परत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता राहुल गांधी उच्चा न्यायालयात अपिल करणार आहेत.