‘मुंबईच्या वसतिगृहात तरुणीसोबत घडलेल्या घटनेला सरकार जबाबदार’; सुप्रिया सुळे आक्रमक
मुंबई : मुंबईतील चर्चगेट भगातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका तरूणीवर बलात्कार करून त्यानंतर तिची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर वसतिगृहात कार्यरत कार्यरत असलेल्या संशयित सुरक्षा रक्षकाचा मृतदेह रात्री उशीरा चर्नीरोड-ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान आढळला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुंबई येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुंबईत घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत ना केंद्र सरकार गंभीर आहे ना राज्य सरकार..जिथं महिला वसतिगृहे आहेत तेथे सीसीटिव्ही कॅमेरे, दर्जेदार अशी लॉकींग सिस्टिम, सुरक्षाव्यवस्था अशा बाबींना प्राधान्य दिलंच पाहिजे.
हेही वाचा – १० वी पुरवणी परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत..
महिलांच्या सुरक्षेबाबत केंद्र आणि राज्य सरकारचा जो दृष्टीकोन आहे तो फारसा गंभीर दिसत नाही हे अतिशय दुर्दैवी आहे. सर्वप्रथम महिलांच्या सर्व वसतिगृहांना तातडीने सीसीटिव्ही कॅमेरे, बेल्स, लॉकींग सिस्टीम आणि सुरक्षाव्यवस्था आदी पुरविण्याबाबत शासनाने तातडीने पुढाकार घेऊन सकारात्मक कार्यवाही केली पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कोल्हापूरात तणाव असल्याची बातमी येतेय, याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,मला याचं आश्चर्य वाटत आहे की, जेंव्हापासून भाजपा सत्तेत आहे तेंव्हापासून हे सातत्याने का होतेय. सारखंच तणावाचं वातावरण का होतं ? यात राज्याचे नुकसान होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नसेल तर कोणीही येथे गुंतवणूक करणार नाही.वातावरण कलूषित होत आहे हे राज्याच्या गृहखात्याचे घोर अपयश आहे.