जयंत पाटलांचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ नक्की होणार; अजितदादांच्या नेत्याचा इशारा
![Sunil Tatkare said that Jayant Patal's 'correct program' will definitely happen](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Ajit-Pawar-and-Jayant-Patil-780x470.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी माढ्यातील सभेत बोलताना राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाची खिल्ली उडवली होती. जगातला एकमेव पक्ष ज्याला आपल्या चिन्हाखाली न्यायप्रविष्ट लिहावे लागते असा टोला जयंत पाटलांनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम या निवडणुकीत नक्कीच होणार, असा इशाराही दिला आहे.
सुनील तटकरे म्हणाले, की जयंत पाटील हे १९९९ सालापासून घड्याळ चिन्हावर जिंकले आहेत. याची जाणीव त्यांनी ठेवावी. घडाळ्याच्या चिन्हाचे पाटील यांना भय का वाटत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत स्ट्राईक रेट जास्त असल्यामुळे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालोच आहोत. जयंत पाटील आतल्या गाठीचे आहेत. त्यांच्या मनात एक आणि ओठावर एक असतं. राष्ट्रवादीचे घड्याळच चालणार हे त्यांच्या मनात आहे. जयंत पाटलांचा यंदा करेक्ट कार्यक्रम होणार असा दावा तटकरेंनी केला.
हेही वाचा – शहरातील प्रलंबित प्रश्नांना आमदार लांडगे यांनीच वाचा फोडली!
अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे विधान केले, त्याबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, प्रत्येक पक्षाला स्वतःचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. अमित शाह महायुतीचे नेते आहेत. अमित शाह यांनी काल भाषणात महायुतीच्या विजयाचा संकल्प केला. तसेच हे करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पाठी ताकद उभी करा, असे म्हटले. त्यामुळे यातून वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. निवडणुकीनंतर महायुती एकत्र बसून निर्णय घेईल.