Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

आमदार अशोक पवारांच्या मुलाला अपहरण करून मारहाण

Ashok Pawar | राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विविध मतदारसंघात नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात अशोक पवार यांच्याकडून शिरुर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या धटनेची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी अशोक पवार यांच्या मुलाची ऋषीराज पवारची एक व्हिडीओ क्लीप दाखवली आहे. त्यामध्ये अपहरण कशा प्रकारे झाले आणि अपहरण झाल्यानंतर आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप व्हिडीओ क्लिपमध्ये ऋषीराज पवार याने केला आहे.

हेही वाचा    –      जयंत पाटलांचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ नक्की होणार; अजितदादांच्या नेत्याचा इशारा 

अॅड. असीम सरोदे म्हणाले, की तो मुलगा घाबरून गेला होता की एवढे पैसे कुठून आणणार? मग त्या मुलाने थोडसं प्रसंगावधान दाखवलं आणि मी बाहेर गेल्यानंतर काही पैसे देऊ शकतो. मी माझे प्रचार करणारे काही लोक आहेत, त्यांना भेटून तुम्हाला काही पैसे देऊ शकतो. मात्र, एवढे पैसे तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे त्या मुलाला त्यांनी बाहेर सोडलं आणि सांगितलं की, तू जर पैसे दिले नाही तर आम्ही हा व्हिडीओ व्हायरल करू. मग तू याची कल्पना करु शकतो. यानंतर तो मुलगा बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणाहून निघून जाण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी त्याला व्हिडीओ दाखवण्यात येत होता, त्यावेळी याने त्या मोबाईलचाही व्हिडीओ पटकन काढून घेतला. तो व्हिडीओ कोणाला तरी पाठवण्यात आल्याचं लक्षात येत आहे. यासंदर्भात ऋषीराज पवार हा गुन्हा दाखल करण्यासाठी शिरून पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस विलंब लावत आहेत, असा आरोप सरोदे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button