breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मला १०० कोटींची ऑफर’; ठाकरे गटातील आमदारांचा मोठा दावा

मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत देखील फूट पडली आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे राहिलेल्या नेत्यांनाही भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मलाही १०० कोटींची ऑफर आहे, असं सुनील राऊत म्हणाले. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सुनील राऊत म्हणाले, संजय राऊतांनीही विचार केला असता, भाजपासमोर गुडघे टेकले असते तर ते साडेचार महिने तुरूंगात गेले नसते. मंत्री झाले असते. पण संजय राऊत डमगमला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निष्ठा होती. पक्षासाठी, संघटनेसाठी त्यांनी जे केलं त्यापेक्षाही जास्त माझ्या घरच्यांनी केलं.

हेही वाचा – ‘अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र’; रामराजे निंबाळकर यांचं विधान 

मला आजही १०० कोटींची ऑफर आहे. मी आमदार आहेच, पण माझ्या मागे माझा ब्रॅण्ड संजय राऊत असल्याने मला १०० कोटींची ऑफर आहे. १०० कोटी रूपये घेऊन मला शिवसेना मिळणार आहे का? निष्ठा मला मिळणार आहे का? माझ्यासाठी काम करणारे शिवसैनिक मिळणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button